करमाळा प्रतिनिधी

लोकसभा 2024  उमरड येथील मतदार यादीमध्ये स्थलांतरित न झालेले उमरड येथेच रहिवाशी जिवंत असलेल्या माणसांच्या नावाच्या पुढे डिलीट असा सिक्का मारण्यात आला असल्याने शेकडो मतदार मतदान करण्यापासून वंचित राहिले याला

जबाबदार कोण ? डिलीटचे सिक्के कोणत्या कर्मचाऱ्यांनी मारले व कशाच्या आधारे मारले ? याचा शोध घेऊन संबंधित कर्मचाऱ्यावरती कायदेशीर कार्यवाही करावी अशी मागणी बहुजन संघर्ष सेनेचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ कदम व ग्रामपंचायतचे

माजी सरपंच संदीप मारकड-पाटील, पोंधवडीचे सरपंच मनोहर कोडलिंगे यांनी केली आहे. या मागणीचे निवेदन तहसीलदार शिल्पा ठोकडे यांनी स्वीकारले व कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *