सोलापूर दि.03 (जिमाका) :-  लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून, निवडणूक प्रक्रियेस दि. 16 मार्च 2024 रोजी पासून सुरुवात झाली आहे. लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 अंतर्गत जिल्ह्यातील  सोलापूर-42 (अ.जा.) व माढा-43 लोकसभा मतदार संघाचे मतदान दिनांक- 07  मे 2024 रोजी होणार आहे. लोकसभा सार्वत्रिक निवडणूक ही विनाअडथळा व भयमुक्त वातावरणात आणि निःपक्षपातीपणे पार पाडण्यासाठी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता कलम 1973 चे कलम 144 लागू केले आहे.

           फौजदारी प्रक्रिया संहिता कलम 1973 चे कलम 144 अन्वये  सोलापूर-42 (अ.जा.) व माढा-43 लोकसभा मतदार संघाच्या हद्दीतील पोलीस आयुक्त सोलापूर शहर यांची हद्द वगळून मतदानाचा दिनांक- 07 मे 2024 च्या दोन दिवस अगोदर म्हणजेच  दि. 05 मे 2024 रोजी सायं. 6.00 वाजले पासून ते मतदान झालेनंतर एक दिवसानंतर म्हणजे दि- 08 मे 2024 रोजी सायंकाळी 6.00 वाजेपर्यंत बेकायदेशीर जमाव जमविणे आणि सार्वजनिक सभा, बैठका घेणे.  तसेच पाच किंवा पाचहून जास्त लोक एकत्र येणे, या कृती करण्यास मनाई करण्यात आली आहे.

   तथापि सदर आदेश मतदाना करीता घरोघरी जाऊन भेटी देण्यासाठी लागू राहणार नाही. आदेशाचा कोणत्याही प्रकारे भंग केल्यास, ती व्यक्ती भारतीय दंड संहितेच्या कलम 188 प्रमाणे शिक्षेस पात्र राहील.असे आदेशही जिल्हा दंडाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिले आहेत.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *