करमाळा प्रतिनिधी 

विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त कालकथित बबन बाबुराव लोंढे व कालकथित पुष्पा बबन लोंढे यांच्या स्मरणार्थ लोंढे परिवाराच्या वतीने तथागत गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दोन मुर्त्या भारतीय बौद्ध

महासभा शाखा करमाळा यांना भालचंद्र बाबुराव लोंढे यांच्या हस्ते दान करण्यात आल्या. यावेळी विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीचे सर्व पदाधिकारी व करमाळा शहरातील सर्व बौध्द उपासक उपासिका मोठ्या संख्येने

उपस्थितीत होते. या मंगल प्रसंगी बौद्धचार्य व केंद्रीय शिक्षक प्रशांत कांबळे व बौध्दाचार्य सावताहारी कांबळे यांनी बौद्ध वंदना घेऊन या मुर्त्यांचा स्वीकार केला. यावेळी लोंढे परिवारातील भालचंद्र लोंढे, राकेश लोंढे, राहुल लोंढे, विशाल लोंढे, अभिजीत लोंढे, पुष्पराज लोंढे, आदी सदस्यांच्या हस्ते या मुर्त्या देण्यात आल्या.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *