करमाळा प्रतिनिधी

वेताळपेठ येथील श्रीराम मंदिरात रामनवमीच्या निमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. १७ एप्रिल रोजी रामनवमी दिवशी सकाळी ८ ते १० यावेळेत श्रीरामाचा पवमान अभिषेक मंगेश देशपांडे यांचे अधिपत्याखाली होणार आहे.

त्यानंतर १० ते १२ या कालावधीत श्रीराम जन्माचे किर्तन ह.भ.प. अॅड. डॉ. बाबूराव हिरडे यांचे होणार आहे. यावेळी ह.भ.प.कानिफनाथ महाराज आगम, ह.भ.प. बबन महाराज विंचू तसेच खोलेश्वर भजनी मंडळ व हनुमान भजनी मंडळ (पोथरे)

यांची साथ लाभणार आहे. त्यानंतर भाविकांना प्रसाद देण्यात येणार आहे. तसेच रात्री भजनाचा कार्यक्रम होणार आहे. १८ एप्रिलला सकाळी १२ ते ३ या कालावधीत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी जास्तीत जास्त भाविकांनी

उपस्थित रहावे. तसेच याकामी ज्या भाविकास आर्थिक मदत करायची आहे; अशांनी मंदिर समितीकडे संपर्क साधावा; असे आवाहन श्रीराम मंदिर ट्रस्ट (वेताळपेठ) तर्फे करण्यात आले आहे.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *