
करमाळा प्रतिनिधी
करमाळा शहरात व तालुक्यात रमजान ईद उत्साहात साजरी करण्यात आली असून आज सकाळी साडे आठ वाजता ईदगाह मैदान येथे नमाज पठण झाल्यावर या ठिकाणी माण तालुकयाचे नेते अभयसिंह जगताप यांनी सर्व मुस्लिम बांधवांचे गुलाबाचे फूल देऊन स्वागत केले आहे. तसेच शहरात अभयसिंह जगताप व शितलदेवी मोहिते पाटील यांनी शहरातील मुस्लिम बांधवांच्या घरी जाऊन शुभेच्छा दिल्या.




