
करमाळा प्रतिनिधी
पाथुर्डी येथील युवा उद्योजक सिध्दार्थ मोटे यांच्या नेतृत्वाखाली पाथुर्डी गावचे उपसरपंच प्रकाश खरात यांचेसह सुरज दरगुडे, खंडू नाळे, रामा काळे, अनु मुलाणी यांचे सह गावातील युवक कार्यकर्ते यांनी माजी आमदार नारायण पाटील यांच्या गटातून

करमाळा-माढा विधानसभा मतदारसंघाचे विकासप्रिय आमदार संजयमामा शिंदे यांच्या गटात जाहिर प्रवेश केला. हा प्रवेश म्हणजे आ. संजयमामा शिंदे यांनी माजी आ. नारायण पाटील यांच्या बालेकिल्ल्यात मारलेली जोरदार मुसंडी आहे. या प्रवेशामुळे येणाऱ्या भविष्यकाळात करमाळा तालुक्याच्या पूर्व भागातील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलणार आहेत.

या प्रवेश सोहळ्याच्या वेळी व्यासपीठावर माजी ता.पं.सदस्य विलासदादा पाटील, घोटी गावचे सरपंच विलासकाका राऊत, म्हैसगांवचे युवा नेते लक्ष्मण पाटील, उंदरगांवचे जेष्ठ नेते जालिंदरभाऊ कोकरे, अनिल पाटील सर, जिंती गावचे युवा नेते

ॲड. नितीनराजे भोसले, पै. चंद्रहासबापू निमगीरे, माजी जि.प.सदस्य उध्दवदादा माळी, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष भरतभाऊ आवताडे, सुजीततात्या बागल,केमचे उपसरपंच सुलतान मुलाणी, गोरख पारखे, राजाभाऊ बेरे, साडे गावचे सरपंच

मयुर पाटील, निंभोरे गावचे सरपंच रविंद्र वळेकर, निंभोरे गावचे चेअरमन तात्यासाहेब वळेकर, कांतीलाल राऊत, पै. अनिल पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष हनुमंत महाडिक, रायचंद खाडे, विटचे माजी सरपंच उदय ढेरे, मलवडी गावचे ग्रा.पं.सदस्य सतीश पन्हाळकर, सचिन ओहोळ, वैभव कोकरे उपस्थित होते.
आमदार संजय मामा शिंदे यांच्या विकास कामावरती प्रभावित होऊन पाथर्डी गावातील अनेक कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला. युवराज मोटे, हरिबा मोटे, चांगदेव मोटे, वाजय लगस, किरण वाघे, राजाभाऊ नाळे, लक्ष्मण दरगुडे, सोमनाध मोटे, राजाभाऊ काळे, बाळू लगस, विठ्ठल वाघे, राहूल मोटे, बाळू मोटे, भाऊसाहेब खरात, दादा शिंदे, राहुल गोरे, रघुनाथ पोठरे, भागवत मोटे, आण्णा माने, बाबासाहेब खरात, शिवाजी वाघे, ओंकार वाघे, गणेश वाघे, समाधान खरात व ग्रामस्थ महिला भगिनी, तरुण मित्र मोठ्या संख्येने उपस्थित होते.
