
कमलाई नगरी
श्रीजगदंबा कमलादेवी मंदिरामध्ये श्रीकमलादेवी चरणी चांदीचे गंगाळ व चांदीचा तांब्या अंदाजे साडेतीन किलो वजनाचे वस्तुरूप देणगी रामचंद्र माने रा. धायखिंडी ता.करमाळा यांच्याकडून अर्पण करण्यात आले आहे, दिगंबर दत्तात्रय देशमुख

रा.करमाळा यांच्या कडुन ११०००/- (अकरा हजार) धनादेश (चेक), बाळासाहेब काशिनाथ फंड रा.करमाळा यांच्याकडून २००१/- (दोन हजार एक रुपये), त्रिंबक गोविंदराव घाडगे १००१/- (एक हजार एक रुपये) ऑनलाइन, सोहम जयंत कुलकर्णी रा.करमाळा

१००१/- (एक हजार एक रुपये) ऑनलाइन, हरिभाऊ गणपतराव नलवडे रा.कामोणे रोख यांच्याकडून १००१/- ( एक हजार एक) त्यानिमित्त मंदिर समितीच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.

मंदिर समितीचे अध्यक्ष सोमनाथ चिवटे, सचिव अनिल पाटील, विश्वस्त सुशील राठोड, डॉक्टर प्रदीप कुमार जाधव पाटील, डॉक्टर महेंद्र नगरे, अॅड. शिरीषकुमार लोणकर, राजेंद्र वाशिंबेकर, पुरोहित सुशील पुराणिक, रविराज पुराणिक,पुजारी

दादासाहेब पुजारी, ओंकार पुजारी, सचिन सोरटे, किसन (आप्पा) सोरटे, नारायण सोरटे, प्रशासनाधिकारी महादेव भोसले, व्यवस्थापक अशोक गाठे उपस्थित होते.

