करमाळा प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार सामाजिक न्याय विभागाच्या वतीने मुंबई प्रदेश कार्यालयात जयंत पाटील व पंडित कांबळे यांच्या प्रमुख उपस्थित महाराष्ट्रातील अनेक सामाजिक व राजकीय संघटना प्रमुखांनी जाहीर प्रवेश व जाहीर पाठींबा दिला. तसेच सामाजिक न्याय विभागाच्या नवीन पदाधिकारी यांना नियुक्ती पत्र देण्यात आले.

करमाळा तालुक्यातील जातेगांव येथील आप्पा उत्तम आरणे यांची सामाजिक न्याय विभाग महाराष्ट्र प्रदेश च्या संघटक सचिव पदी नियुक्ती करण्यात आली. त्यांना जयंत पाटील, मा. आमदार शशिकांत शिंदे, सामाजिक न्याय विभागाचे प्रदेशाध्यक्ष पंडित कांबळे, सोलापूर जिल्ह्याचे ग्रामीण चे जिल्हाध्यक्ष बळीराम काका साठे, संजय कोकाटे, लक्ष्मण कांबळे, संजय गायकवाड, शैलेंद्र जाधव, ललिताताई मगरे, संदीप गवई, कुणाल नकवाल, अरुण धर्माळे, मोहन चव्हाण उपस्थित होते.

आप्पा उत्तम आरणे गेली अनेक वर्ष सामाजिक राजकीय क्षेत्रात कार्यरत असून त्यांचे आजोबा यादव जी गिरमा आरणे 15 वर्ष सोलापूर जिल्हा परिषदेचे सदस्य होते तसेच करमाळा विधानसभा मतदार संघात व सोलापूर जिल्ह्यात राजकीय क्षेत्रात त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला होता. करमाळा विधानसभा मतदार संघातून इच्छुक म्हणून उमेदवारी मागितली होती. आरणे परिवार करमाळा तालुक्यात राजकीय परंपरा असलेले व राजकीय वारसा असलेले कुटुंब म्हणून ओळखले जाते.

आप्पा उत्तम आरणे यांनी आपल्या मनोगत व्यक्त करताना सांगितले कि, जयंत पाटील व सामाजिक न्याय विभागाचे पंडित कांबळे यांनी माझ्यावर फार मोठी पक्षीय जबाबदारी दिली आहे. सामाजिक न्याय विभागाची संघटनात्मक बांधनी संपूर्ण महाराष्ट्र फिरून सक्षम करण्यात आम्ही कुठेही कमी पडणार नाही. नेत्यांनी टाकलेला विश्वास कमी होणार नाही. पवार यांचे विचार शोषित, पीडित, मागासवर्गीय शेतकरी, अल्पबुधारक कामगार, कष्टकरी, शेतमजूर यांच्या पर्यंत पोहचवू. लोकसभा व विधानसभा निवडणुकीत आपल्या पक्षाच्या विजया साठी प्रयत्न करू असा विश्वास त्यांनी दिला. पक्षाने पदाची जबाबदारी दिल्या बदल वरिष्ठ नेत्यांचे आभार व्यक्त केले.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *