
श्री चंद्रहास चोरमोले जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वीट यांना करमाळा पंचायत समिती मार्फत आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित
करमाळा प्रतिनिधी

चंद्रहास चोरमोले जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वीट येथील शिक्षक यांना करमाळा पंचायत समितीच्या वतीने आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.उपजिल्हाशिक्षण अधिकारी जावीर, गटविकास अधिकारी मनोज राऊत,गटशिक्षण अधिकारी राजकुमार पाटील, यांच्या हस्ते फेटा शाल श्रीफळ सन्मानचिन्ह सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले

आहे.पुरस्कार मिळाल्याने आपले मनःपूर्वक अभिनंदन आपण आपल्या विद्यार्थ्यांना दिलेल्या ज्ञानाची ही पावती आहे.आणी आपल्या गावाचे नाव सुद्धा उंचावले खरोखरच अतिशय आनंद होत आहे की आपण शाळेचा देखील आपल्या माध्यमातून सर्वांच्या सहकार्याने कायापालट आपण केलेला आहे. आपला आम्हाला आणि ग्रामस्थांना सार्थ अभिमान आहे.आपण असेच

मार्गदर्शन करत राहाल. निवडी बद्दल सर्व स्तरातून त्याचे कौतुक होत आहे आजी माजी सभापती,उपसभापती,सदस्य, सरपंच यांनी देखील या निवडीबद्दल त्याचे भरभरून कौतुक केले व पुढील भावी वाटचालीस शुभेच्छा व अभिनंदन करून वीट परिसरामध्ये सर्वत्र त्याचे कौतुक होत आहे.
