
करमाळा प्रतिनिधी
माढा लोकसभा मतदारसंघातील जनतेच्या भावना जाणुन घेण्याच्या निमित्तानं आज आपल्या करमाळा तालुक्यातील चिखलठाण येथे माजी.जि.प सदस्या शितलदेवी धेर्यशील मोहिते पाटील यांनी भेट देवुन कोटलिंग देवस्थान येथे दर्शन घेवुन ग्रामस्थांसमवेत संवाद साधला व आगामी भूमिके संदर्भातील कौल जाणून घेतला.

यावेळी सरपंच धनश्रीताई गलांडे,विकास गलांडे,पं.स.मा.उपसभापती दत्ता सरडे,अदिनाथचे मा.व्हा.चेअरमन केरु गव्हाणे,अदिनाथचे मा.संचालक धुळाभाऊ कोकरे,मकाईचे संचालक दिनकर सरडे,मा.संचालक महादेव सरडे,हेमंत बारकुंड,आनंद पोळ,पुष्पा ताई चव्हाण,संगिताताई सरडे व इतर मान्यवर उपस्थित होते.



