
सोलापूर दि.21 (जिमाका) :-अन्न व औषध प्रशासनाकडून एप्रिल 2023 ते 19 मार्च 2024 या कालावधीत सोलापूर शहर व जिल्ह्यात 41 ठिकाणी टाकण्यात आलेल्या धाडीमधील गुटखा, पानमसाला, सुगंधित तंबाखु या अन्न पदार्थाचा सुमारे 63

लाख 72 हजार 47 रपयांचा साठा नष्ट करण्यात आला असल्याचे अन्न औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त साहेबराव देसाई यांनी सांगितले आहे.

सदरचा साठा 20 मार्च 2024 रोजी मे. किर्ती अॅग्रोटेक, बोरामणी, (ता. दक्षिण सोलापूर) या कपंनीच्या आवारात मोकळ्या जागेत जाळून नष्ट करण्यात आला . यावेळी अन्न औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त साहेबराव देसाई, सुनिल जिंतुरकर,

अन्न सुरक्षा अधिकारी श्रीमती अस्मिता टोणपे, श्रीमती रेणुका पाटील, उमेश भुसे व श्रीमती नंदिनी हिरेमठ तसेच सोलापूर तालुका व मंद्रुप पोलिस स्टेशनचे पोलिस कर्मचारी हे उपस्थित होते.
