सोलापूर दि.21 (जिमाका) :-  दर वर्षी 1 एप्रिलला बाजारमुल्य दर तक्ते प्रसिध्द होत असल्याने.  मार्च महिन्यात सर्व दुय्यमनिबंधक कार्यालयात दस्त नोंदणीसाठी पक्षकारांची गर्दी असते. तसेच अर्थिक वर्ष 2023-2024 या वर्षाचा इष्टांक पूर्ण

करण्याच्या दृष्टीने  महाराष्ट्र मुद्रांक शुल्क (अभय योजना)  या संबधीचे कामकाज करण्यासासाठी व दस्त नोंदणसाठी दुय्यम निबंधक कार्यालयात पक्षकारांची गर्दी वाढत आहे. त्यामुळे पक्षकारांच्या सोयीसाठी सोलापूर जिल्ह्यातील मुद्रांक

जिल्हाधिकारी कार्यालय व सर्व दुय्यम निबंधक कार्यालये दि.23 मार्च व  24 मार्च 2024 तसेच दि29 मार्च ते 31 मार्च 2024 या  शासकीय सुट्ट्यांच्या दिवशी  दिवशी सुरू ठेवण्यात येणार असल्याचे सह जिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी ,सोलापूर यांनी पत्रकान्वये कळविले आहे.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *