
करमाळा प्रतिनिधी
निंभोरे येथे श्री खंडेश्वर यात्रेनिमित्त भव्य अशा हाफपीच टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा सरपंच, उपसरपंच चषकाचे उदघाटन ज्येष्ठ नेते व श्री खंडेश्वर पंच कमिटीचे प्रमुख हरिकाका वळेकर, घोटीचे सरपंच विलासकाका पाटील, निंभोरे गावचे युवा

लोकनियुक्त सरपंच रविदादा वळेकर, उपसरपंच संतोष पाटील, नूतन सदस्य धनु वळेकर, सदस्य दिनेश फरतडे, लालू कळसाईत, दत्ताभाऊ वळेकर, ईश्वर मस्के, महेश जाधव, महेश वाघमारे, महेश पवार, मनोज काळदाते, सुशांत वळेकर, सौरभ

जमदाडे, अभिनव जगताप, शरद मोरे, योगेश वाघमारे, जलाल पठाण, अण्णा जगताप, गणेश वळेकर तसेच साडे व घोटीचे संघ, निंभोरे टीम, आयोजक मंडळी उपस्थित होते.

सुरुवातीचा सामना घोटी व साडे या संघामध्ये झाला. त्या सामान्याचे नाणेफेक सरपंच रविदादा वळेकर यांचे हस्ते करण्यात आले. या चषकाचा अंतिम सामना रविवारी दि.17/12/2023 रोजी होणार आहे. आत्ता पर्यंत बहुसंख्य संघांनी नोंदणी केली आहे.


