
करमाळा प्रतिनिधी
संगोबा ते घारगाव पर्यंत रस्त्यावर खड्डेच खड्डे झालेले आहेत. त्या खड्ड्यामध्ये पावसाचे पाणी साचत असल्यामुळे वाहन चालकांना त्याचा अंदाज येत नाही त्यामुळे नागरिकांना शेतकऱ्यांना व शालेय विद्यार्थ्यांना प्रवास करताना तारेवरची कसरत

करावी लागते. हा रस्ता येणाऱ्या जाणाऱ्या वाहतुकीमुळे रस्ता निसरडा झाला असून शालेय विद्यार्थ्यांच्या दोन चाकी वाहने घसरण्याची दाट शक्यता आहे. हा रस्ता मराठवाड्याला जोडला गेलेला आहे. या रस्त्यावरून सारखी रहदारी चालू आहे. नाहक

सर्वांना याचा त्रास होत आहे. सदरचा रस्ता मराठवाड्यातील परांडा भूम धाराशिव ला जोडणारा आहे. सदर रस्त्यावर मराठवाड्यात जाणाऱ्या वाहनांची बऱ्यापैकी ये जा होत असते तरी प्रशासनाने व लोकप्रतिनिधी याकडे लक्ष देऊन योग्य ती कार्यवाही करावी खड्डे बुजवावेत, असे घारगावच्या सरपंच लक्ष्मी संजय सरवदे यांनी सांगितले आहे.


