
सत्ताधारी राजकीय नेते अपयश झाकण्यासाठी स्टंटबाजी करत आहे – प्रा. रामदास झोळ सर
करमाळा प्रतिनिधी
करमाळा तालुक्यातील शेतकरी उघड्यावर पडलेला असताना आमदार संजयमामा शिंदे, माजी आमदार नारायण पाटील, रश्मी दिदी बागल गट केवळ वृत्तपत्रातून पेपर बाजी करून आपले अस्तित्व टिकवण्याचा केविलवाना प्रयत्न करत आहेत त्या ऐवजी त्यांनी लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी रस्त्यावर उतरावे अन्यथा राजकारणातून बाजूला व्हावे.

तालुक्याला एक सक्षम पर्याय नेतृत्व देण्यासाठी आम्ही कटिबद्ध असून इथून पुढे स्वार्थाच्या गटातटाच्या व सौदेबाजी राजकारणाला जनता थारा देणार नाही असे परखड मत दत्तकला शिक्षण संस्थेचे चेअरमन रामदास झोळ यांनी व्यक्त केले आहे.

माजी आमदार नारायण पाटील यांनी काही गावात जल जीवन योजनेची भूमिपूजन करून गावागावात पाण्याची टँकर सुरू करा अशी मागणी केली आहे यासंदर्भात वृत्तपत्रात आलेल्या बातमीवरून टीका करताना प्राध्यापक रामदास झोळ म्हणाले की, जलजीवन योजना ही केंद्र सरकारची आहे याचे उद्घाटन करण्याचे त्यांना काही अधिकार नाही केवळ प्रसिद्धीचा स्टंट करण्यासाठी अशी उद्घाटने आपल्या बगलबच्चांना हाताशी धरून केली जात आहेत. गावागावात टँकर चालू करा अशी भाषा करणे म्हणजे सांगितले. दहा-पंधरा वर्षाच्या राजकारणात जनतेला पाणी देऊ शकला नाही. उलट आम्ही आमच्या प्रयत्नाने गावोगावी स्वखर्चाने पाण्याची टँकर उपलब्ध करून दिले आहेत. करमाळा तालुक्यात सध्या सक्षम विरोधक नाही ही तालुक्याची खंत आहे.

उपजिल्हाधिकारी नाही तहसीलदार नाही मुख्याधिकारी नाही सहाय्यक निबंधक नाही गट विकास अधिकारी नाही यास कोणताच अधिकारी करमाळा कायमस्वरूपी उपलब्ध नाही सर्व जागा रिक्त आहेत शिक्षक नाही म्हणून विद्यार्थ्यांना पंचायत समिती समोर येऊन आंदोलन करावे लागत आहे या रिक्त जागा भरण्यासाठी सुद्धा राजकीय पदाधिकारी काम करत नाहीत. या समस्या सोडविण्यास सुद्धा आमदार संजयमामा शिंदे अपयशी ठरले आहेत.

तालुक्यातील सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही सदैव कटिबद्ध असून सातत्याने काम करीत राहणार आहोत
आदिनाथ व मकाई कारखान्याचे नुकसान संगणमताने करणारे खड्यासारखे जनता बाजूला करणार आहे
आता राजकीय स्वार्थासाठी मकाईच्या निवडणुकीच्या निमित्ताने रश्मी दिदी बागल गट व नारायण पाटील गट एकत्र आले आहेत. दोघे एकत्र आले तरी जनता यांना यांची जागा दाखवणार आहे. शेतकऱ्यांचे पेमेंट थकवले त्याचे काय ?
सक्षम पर्याय म्हणून आम्ही सर्व सहकाऱ्यांना बरोबर घेऊन पुढे येत असून जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले.
जल जीवन मिशन योजनेचे उद्घाटन किंवा शुभारंभ राजकीय पदाधिकाऱ्यांच्या हस्ते करू नये असे लेखी आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी दिलेले असताना केवळ प्रसिद्धीचा स्टंट करण्यासाठी केंद्र शासनाच्या योजनेचा भूमिपूजन करून प्रसिद्धी मिळवण्याची नौटंकी केली जात आहे. या योजनेचे उद्घाटन करून संबंधित ठेकेदारावर आपला प्रभाव टाकून त्या ठेकेदाराकडून काही पदाधिकारी कमिशन लाटत असल्याच्या तक्रारी आहेत यामुळे ठेकेदार सुद्धा हवालदिल झाले आहेत याकडेही जिल्हा परिषद मुख्याधिकारी दिलीप स्वामी यांनी लक्ष द्यावे अशी मागणी प्राध्यापक रामदास झोळ यांनी करमाळा तालुक्यातील जनतेच्या वतीने केली आहे.