
कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ची रमजान निमित्त सदिच्छा भेंट
करमाळा प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य कॉंग्रेस आय पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज पुणे शहर कॉंग्रेस पक्षाचे शहर उपाध्यक्ष तथा करमाळा मुस्लिम समाजाचे अध्यक्ष हाजी उस्मानशेठ तांबोळी यांचे निवासस्थानी रमजान ईद च्या शुभेच्छा देण्यासाठी सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांच्या समवेत पुणे शहर कॉंग्रेस आय पक्षाचे शहर अध्यक्ष अरविंद शिंदे तसेच भिवंडी चे नगरसेवक आदी पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी पुणे शहर कॉंग्रेस पक्षाचे वतीने प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा सत्कार हाजी उस्मानशेठ तांबोळी यांनी केला.
यावेळी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, मि रमजान ईद च्या शुभेच्छा देण्यासाठी आमचे कॉंग्रेस पक्षाचे पुणे शहराचे उपाध्यक्ष हाजी उस्मानशेठ तांबोळी यांचे निवासस्थानी आवर्जुन आलो आहे, ही भेट राजकीय स्वरुपाची नसुन सामाजिक बांधीलकी जोपासत मी आवर्जुन रमजान ईद च्या शुभेच्छा देण्यासाठी आलो आहे, असे त्या॑नी यावेळी बोलताना सांगीतले. यावेळी अझहर ताबोंळी, अर्शद तांबोळी आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

