पाडळी येथे संविधान चौका चे अनावरण व भिमजयंतीनिमित्त भव्य मिरवणूक संपन्न

करमाळा प्रतिनिधी

पाडळी येथे आंबेडकर जयंतीनिमित्त भव्य मिरवणूक काढण्यात आली तसच बहूजन नेते नागेश दादा कांबळे यांच्या हस्ते व लक्ष्मणराव भोसले, प्रफुल्ल दामोदरे यांच्या प्रमुख उपस्थितीत संविधान चौक नामकरण करून फलकाचे अनावरण करण्यात आले.

यावेळी नागेश दादा कांबळे यांनी आंबेडकरी बांधवांना मार्गदर्शन करताना आंबेडकरवाद व ब्राह्मणवाद हि लढाई समजून घेण्याची गरज आहे. त्याप्रमाणे चळवळीत कार्यरत रहावे असे प्रतिपादन केले. यावेळी नागेशदादा कांबळे, लक्ष्मणराव भोसले, आरपीआय मराठा आघाडी चे शिवाजी शिंदे, सुरेश खरात, प्रफुल्ल दामोदरे यांचा पाडळी येथील उत्सव समिती तर्फे सन्मान करण्यात आला.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *