
सेतु सुविधा केंद्र चालू करावे
करमाळा प्रतिनिधी
सेतु सुविधा केंद्र बंद पडल्यामुळे सामान्य नागरिकांचे हाल होत आहे.
आपले सरकार सेवा केंद्र, सीएससी सेंटर आदी खाजगी केंद्रात जाऊन जादा पैसे नागरीकांना मोजावे लागत आहे. सेतु सुविधा केंद्रात तहसीलदार यांच्या सुचनेनुसार कमी व शासकीय नियमाने विविध दाखल्यासाठी शालेय कागदपत्रांसाठी कमी पैसे घेत होते परंतु दिं. 1 एप्रिल पासून ते बंद केल्याने नागरिक तेथे येऊन गर्दी करून बंद असल्याने निघून जात आहे. आवश्यक

कागदपत्रे लवकरात लवकर मिळावे म्हणून आपले सरकार सेवा केंद्र, सीएससी सेंटर आदी खाजगी केंद्रात जाऊन जादा पैसे ते देत आहे. यामुळे नागरिक हैराण झाले आहे, तरी लवकरात लवकर सेतु सुविधा केंद्र चालू करावे अशी मागणी शाळकरी विद्यार्थीनी-विद्यार्थी यांनी केली आहे.

