करमाळा तालुक्यात सामाजिक सद्भाव बैठक संपन्न

करमाळा : सामाजिक एकात्मता, बंधुभाव आणि परस्पर समन्वय वाढविण्याच्या उद्देशाने करमाळा तालुक्यात सामाजिक सद्भाव बैठक उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. या बैठकीस तालुक्यातील विविध ज्ञातींचे प्रतिनिधी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. संग्राम दयाळ यांनी केले. कार्यक्रमाची सुरुवात बापट-थिगळे मॅडम यांच्या वंदे मातरम् गीताने झाली.
यावेळी प्रमुख उपस्थिती असलेले डॉ. सचिन लादे यांनी सामाजिक सद्भाव या विषयावर मार्गदर्शन केले. समाजातील विविध घटकांमध्ये परस्पर स्नेह, बंधुभाव, संवाद आणि सामाजिक एकात्मता निर्माण करण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी केले.
‘पंच परिवर्तन’ आणि ‘सामाजिक रक्षाबंधन’ या विषयावर प्रा. सुनील जगताप सर यांनी मार्गदर्शन केले. सामाजिक परिवर्तनासाठी सकारात्मक विचार, संस्कार आणि समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन पुढे जाण्याचे महत्त्व त्यांनी विशद केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका सद्भाव संयोजक संतोष गोरख कांबळे यांनी केले. विविध ज्ञाती व समाजघटकांना एकत्र आणून सामाजिक सलोखा आणि सद्भावना अधिक दृढ करण्याच्या उद्देशाने बैठकीचे आयोजन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी नाना रामनवमीवाले यांनी सामुदायिक गीत सादर केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन दिगंबर पवार यांनी केले.
विविध समाजघटकांचे प्रतिनिधी एकाच व्यासपीठावर एकत्र येऊन सामाजिक सद्भाव, समरसता आणि एकात्मतेचा संदेश देत असल्याने ही बैठक विशेष ठरली.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *