करमाळा प्रतिनिधी

श्रीसंत नामदेव शिंपी महाराज व परिवार संजीवन समाधी सोहळ्या निमित्त आज अखंड हरिनाम सप्ताह भक्तिमय, आनंदी उत्साही, वातावरणा मध्ये, संपन्न झाला आहे.सुरुवात करमाळा श्रीसंत नामदेव शिंपी समाज अध्यक्ष, विश्वस्त, सचिव,संपर्क प्रमुख,ज्येष्ठ समाज नागरीक, महिला ,शिंपी समाज बंधू आणि भगिनी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हरिनाम सप्ताहाची सुरुवात झालेली आहे.
श्री संत नामदेव शिंपी महाराज आणि परिवार संजीवन समाधी सोहळा दिनांक११.०८.२०२६ रोजी आहे. या निमित्त महाप्रसादाचे आयोजन कै. अजिनाथ रंगनाथ गाठे यांच्या स्मरणार्थ श्री.प्रशांत गाठे व श्री. प्रवीण गाठे व गाठे परिवार यांच्या कडून करण्यात आलेले आहे. श्री संत नामदेव शिंपी महाराज व परिवार संजीवन समाधी सोहळा सन २०२७ चे महाप्रसाद अन्नदानाचे यजमान हे श्री.श्रीराम बुलबुले (गुरुजी) हे असणार आहेत.
याच दिवशी शिंपी समाजातील कष्टाळु होतकरू महिला यांचा सन्मान शिंपी समाजाच्या वतीने सौ.पुष्पा वादवणे. व श्री.कैलास
वादवणे. करमाळा यांच्या वतीने करण्यात येणार आहे.
तसेच या दिवशी काल्याचे किर्तन श्रीसंत नामदेव महाराज प्रतिमेवर पुष्प वर्षाव होऊन करमाळा शहराच्या प्रमुख मार्गावरून महिलांची टाळकरी दिंडी एका पोशाखातील निघणार आहे तरी सर्व शिंपी समाज बांधवांनी वेळात वेळ काढून उपस्थित राहून या सोहळ्याची शोभा वाढवावी . असे आवाहन करण्यात आले आहे. अशी माहिती
*श्री पांडुरंग वडे*
सचिव
शिंपी समाज पंच वाडा करमाळा यांनी दिली आहे.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *