
करमाळा प्रतिनिधी
करमाळा तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्ते विकासासाठी नुकताच ८ कोटी ५० लाख रुपयांचा निधी महाराष्ट्र शासनाकडून मंजूर करण्यात आलेला आहे. त्यावरून करमाळा तालुक्याचे आमदार नारायण आबा पाटील तसेच भाजपा नेते दिग्विजय बागल व रश्मीताई बागल यांच्याकडून या कामाचे श्रेय घेण्यासंदर्भात प्रसिद्धी माध्यमांना प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. त्यावर प्रतिक्रिया देताना माजी आमदार संजयमामा शिंदे गटाचे सरपंच रवींद्र वळेकर म्हणाले की, २०२५ मध्ये अतिवृष्टीने नुकसान झालेल्या ग्रामीण रस्त्या संदर्भातील माहिती महाराष्ट्र शासनाने संकलित केलेली होती त्यानुसार प्रत्येक जिल्ह्यातील ग्रामीण रस्त्यांना प्राधान्याने निधी देण्याचे धोरण ठरवले गेलेले होते.

त्यानुसारच करमाळा तालुक्याला दोन टप्प्यांमध्ये दोन मंजूर आदेशाने २०२५ मध्येच हा निधी मंजूर झालेला होता महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभाग शासन निर्णय क्र. जि.प-२०२५-प्र.क्र.३५ (३)/बांध-३, बांधकाम भवन, मर्झबान रोड फोर्ट, मुंबई-४००००१ दि.३१/०३/२०२६ रु.४५० लक्ष या आदेशानुसार ९ रस्त्यांसाठी ४ कोटी ५० लाख व महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभाग शासन निर्णय क्र. जि.प-२०२५-प्र.क्र.३५ (४)/बांध-३, बांधकाम भवन, मझ् बान रोड फोर्ट, मुंबई-४००००१ दि.३१/०३/२०२६ रु.४०० लक्ष या आदेशानुसार ८ रस्त्यांसाठी ४ कोटी निधी असा एकूण १७ रस्ते विकास कामांसाठी ८ कोटी ५० लाख निधी मंजूर झालेला आहे. हे सर्व काम सार्वजनिक बांधकाम विभागाने ग्रामविकास विभागाच्या मदतीने केलेले आहेत त्यामध्ये स्थानिक मागणीचा विषयच येत नाही. सुरू असलेला वाद निरर्थक असल्याचे परखड मत त्यांनी मांडले.
