करमाळा प्रतिनिधी

श्री कमलादेवी मंदिराचे पुरातन दगडी स्वरूपातील असलेले मुळ मंदिराचे दर्शन भाविक भक्तांना मिळणार आहे.

श्री जगदंबा कमलादेवी मंदिर ट्रस्टच्या संयोजकाने श्रीकमलादेवी मंदिर जतन व संवर्धन कामास गेल्या 2-3 वर्षापासून सुरुवात करण्यात आलेली आहे. मंदिर जतन संवर्धनाचे काम प्रगतीपथावर असून भक्तांच्या देणगी रूपी सहकार्यातून या कामास सुरुवात करण्यात आलेली आहे. 

मंदीर जतन संवर्धन कामास आज मंगळवार दिनांक १२ मे २०२६ रोजी भारत उध्दव गवळी रा. अर्जुन सोंड ता. मोहळ यांच्या कडून ऑनलाईन देणगी रु.११,०००/- (अकरा हजार फक्त) देणगी प्राप्त झाली आहे. या निमित्त श्री जगदंब देवी देवस्थान ट्रस्ट कडून त्यांचा सत्कार मंदिर पुजारी बापु (आण्णा) पुजारी, रघुनाथ खटके यांनी सत्कार केला आहे. यावेळी भक्त गण उपस्थित होते.

श्रीकमलादेवी  मंदिर जतन संवर्धन काम प्रगती प्रथावर असल्याकारणाने भाविकांनी सढळ हाताने देणगी देऊन या कामात सहकार्य करण्याचे आव्हान देखील श्री जगदंबा कमलादेवी देवस्थान ट्रस्ट कडून करण्यात आले आहे.

तसेच ऑनलाईन देणगीची सुविधा उपलब्ध आहे. संपर्क अशोक गाठे व्यवस्थापक मो. नं. ९४०४७०८९२४.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *