
जेआरडी माझा
पडसाळी विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या चेअरमनपदी बालाजी नारायण फरड यांची तर व्हाइस चेअरमनपदी विजयकुमार भारत फरड यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

या निवडीनंतर मावळते चेअरमन व व्हा. चेअरमन यांचा सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर नुतन चेअरमन बालाजी फरड व व्हा. चेअरमन विजयकुमार फरड यांचा सत्कार सचिन दादा पाटील व रामचंद्र काका मुटकुळे यांनी केला. यावेळी गुलालाची उधळण करून व पेढे भरवून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

यावेळी पडसाळी विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे संचालक दादासाहेब देशमुख, अण्णासाहेब मुटकुळे, तुकाराम सलगर, गणपत मुटकुळे, बिभीषण माळी, नारायण मुटकुळे, शारदा मुटकुळे, अनिता देशमुख, बाळू थोरात यांच्या शिफारशीने निवड करण्यात आली.

यावेळी माजी सरपंच दत्तानाना फरड, विद्यमान सरपंच योगेश पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष महेश पाटील, ग्रा.पं. सदस्य आण्णासाहेब मुटकुळे, दत्तात्रय देशमुख, तात्यासाहेब फरड, विष्णू फरड, प्रविण पाटील, जयकुमार मुटकुळे, पिंटु सलगर, लक्ष्मण देशमुख, बालाजी मुटकुळे, प्रकाश पाटील, संजय मुटकुळे, सचिन फरड, रामदास फरड, सुग्रीव फरड, दत्तात्रय फरड, धनाजी फरड, सदाशिव फरड, अनुरथ पाटील, विलास देशमुख, सिध्देश्वर देशमुख, करण फरड, ओंकार फरड उपस्थित होते.

निवड प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी निवडणूक अधिकारी म्हणून ललिता बागल मॅडम यांनी काम पाहिले. सचिव विलास चट्टे भाऊसाहेब व गुरुदेव अनभुले भाऊसाहेब यांनी निवड प्रक्रिया पूर्ण केली.