करमाळा प्रतिनिधी
पुणे ते मुंबई या यशवंतराव चव्हाण दृतगती महामार्गावरील लोणावळा घाटातील वाहनांची गर्दी पाहात हलक्या वहानांच्या साठी वाहनांची गर्दी कमी करण्यासाठी व सर्वसामान्यांचे वाढत्या ट्राफिक मुळे अतोनात हाल होत असल्याचे महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजित दादा पवार यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी ट्रॅफिक वरती मात करण्यासाठी हा

नवीन मार्ग तयार करण्याची योजना आखली व ते महाराष्ट्र राज्याचे अर्थमंत्री असल्यामुळे त्यांनी सदरील कामासाठी भरघोस असा निधी देखील उपलब्ध करून दिला. सदरील मार्ग हा अजितदादांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे त्यामुळे त्यामुळे या मार्गाला स्व. अजितदादा पवार यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मा.तालुकाध्यक्ष हनुमंत मांढरे-पाटील यांनी केली आहे.


