करमाळा प्रतिनिधी

वनभवनाबाहेर गणेश भानवसे यांच्या आत्मदहनाचा प्रयत्न; पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला!

सोलापूर : आज सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास सोलापूर जिल्ह्यातील वन विभागाच्या भ्रष्टाचार विरोधात वनभवन पुणे येथील कार्यालया समोर सामाजिक कार्यकर्ते गणेश भानवसे यांनी स्वतःला पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने, तिथे तैनात असलेल्या पोलिसांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे अनर्थ टळला असून संबंधित व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले आहे. मात्र, घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे.
सोलापूर जिल्ह्यातील करमाळा येथील रहिवासी असलेले सामाजिक कार्यकर्ते गणेश भानवसे आज सकाळी ११ वाजता वनभवनाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ पोहोचले. कोणालाही काही समजण्याच्या आतच, त्यांनी सोबत आणलेल्या बाटलीतील डिझेल स्वतःच्या अंगावर ओतून घेतले. ते स्वतःला पेटवून घेण्याच्या तयारीत असतानाच, तिथे तैनात असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी आणि सुरक्षा रक्षकांनी त्यांच्यावर झडप घातली. पोलिसांनी तातडीने त्यांच्या हातातील आगपेटी हिसकावून घेतल्याने मोठा अनर्थ टळला आहे.पोलिसांनी गणेश भानवसे यांना ताब्यात घेऊन वनाधिकारी अमोल थोरात यांच्याशी चर्चा करण्यात आली यावेळी त्यांनी भानवसे यांना अहवाल दिला त्या अहवाला वर गणेश भानवसे यांनी आक्षेप नोंदवला असून अहवाल चुकीचा दिला असल्याने लवकरच वनमंत्री गणेश नाईक यांच्या सरकारी निवासस्थानी आत्मदहन करून करून चौकशी समितीवर कारवाई करण्यास भाग पाडणार असल्याचे सामाजिक कार्यकर्ते गणेश भानवसे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले आहे

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *