
करमाळा – करमाळा तालुका काँग्रेस आयचे तालुकाध्यक्ष मा. श्री.प्रतापराव नामदेवराव जगताप यांचा 24 एप्रिल 2026 रोजी वाढदिवस साजरा करण्यात आला. या वाढदिवसाचे वैशिष्ट्य असे की सर्व अनावश्यक खर्चाला फाटा देऊन समाज उपयोगी कार्यक्रम राबवून हा वाढदिवस साजरा करण्यात आला. शहरातील 130 महिलांना निशुल्क देवदर्शन यात्रेचे आयोजन कै. नामदेवरावजी जगताप प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले होते. दिनांक 18 /4/ 2026 रोजी शहरातील महिला व ज्येष्ठ नागरिकांसाठी एसटी महामंडळाचे सवलत्कारचे शिबिर नामरत्नकॉम्प्लेक्स येथे आयोजित करण्यात आले होते. यामध्ये 190 लाभार्थ्यांनी लाभ घेतला. दिनांक 24 एप्रिल 2026 रोजी करमाळ्यापासून गाणगापूर ते अक्कलकोट ते तुळजापूर ते येरमाळा अशा देवदर्शन यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. या देवदर्शन यात्रेस महिलांचा अभूतपूर्व प्रतिसाद लाभला. सर्व महिला भगिनींच्या उपस्थितीमध्ये अक्कलकोट येथे करमाळा तालुका काँग्रेसचे तालुका अध्यक्ष प्रतापराव जगताप यांच्या शुभहस्ते व सर्व महिला भगिनींच्या उपस्थितीमध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती करण्यात आली. सदर मोफत देवदर्शन यात्रा शुक्रवार दिनांक 24 एप्रिल 2026 रोजी आयोजित करण्यात आली होती. पहाटे 02:30 वाजता एसटी महामंडळाच्या सुसज्ज अश्या बसमधून सदर देवदर्शन यात्रेचे प्रस्थान करण्यात आले. सर्वप्रथम सर्व महिला भगिनींच्या उपस्थितीमध्ये पहाटे 02-30 वाजता 3 एसटी बसचे पूजन करण्यात आले. सदर देवदर्शन यात्रा त्याच दिवशी रात्री 12-15 वाजता कर्मात पोहोचली. यावेळी उपस्थित सर्व महिलांच्या हस्ते सत्कारमूर्ती मा श्री प्रतापराव जगताप यांचा वाढदिवसानिमित्त केक कट करून काही महिलांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी सदर यात्रेसाठी आयोजकाकडून जे उत्तम दर्जाचे सर्व सोई युक्त आयोजन करण्यात आले होते त्यामुळे अनेक महिलांचे डोळे पाणावले होते. दिवसभरामध्ये 43 अंश सेल्सिअस तापमान असल्याने कै. नामदेवरावजी जगताप प्रतिष्ठानच्या वतीने या गोष्टीचा विचार करून प्रत्येक महिलेस उत्तम दर्जाची टोपी पुरवण्यात आली होती. प्रत्येक एसटी बस मध्ये पाच थंड पिण्याच्या पाण्याच्या जारची व्यवस्था करण्यात आली होती. या संपूर्ण यात्रेमध्ये करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती चिंतामणी दादा जगताप, करमाळा नगरपालिकेचे माजी बांधकाम समिती सभापती मा.श्री राहुल भैय्या जगताप उपस्थित होते. संपूर्ण वाढदिवसाचा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी कै. नामदेवरावजी जगताप प्रतिष्ठानच्या संपूर्ण पदाधिकाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.
