करमाळा प्रतिनिधी

भारतीय अभिरूप शिष्यवृत्ती इंग्रजी माध्यमातून घेतला जाणाऱ्या परीक्षेत जयप्रकाश बिले पब्लिक स्कूल झरे, तालुका करमाळा येथील चार विद्यार्थी जिल्ह्यात तसेच दहा विद्यार्थी केंद्रामध्ये गुणवत्ता यादीत आलेले आहेत आणि शाळेची यशाची परंपरा कायम ठेवलेली आहे.

यामध्ये विघ्नेश कादगे (इ. 3री) जिल्ह्यात चौथा, अभय पवार (इ. 3री) जिल्ह्यात सहावा, निर्मित साळुंके (इ 4थी) जिल्ह्यात दुसरा, दर्श रणदिवे (इ. 4थी) जिल्ह्यात तिसरा

तसेच शिवनेरी घनवट (इ.1ली) केंद्रात पहिली, श्रेया क्षीरसागर (इ.1ली) केंद्रात दुसरी, राजवीर सातव (इ. 2री) केंद्रात पहिला, प्रणाली मारकड (इ. 2री) केंद्रात दुसरी, शंभवी सुर्वे (इ.2री) केंद्रात तिसरी, स्वयंम गादिया (इ. 3री) केंद्रात पहिला, शिव गुळवे (इ. 3री) केंद्रात दुसरा, अन्वी घोरपडे (इ. 4थी) केंद्रात पहिली, उत्कर्ष मंजरतकर (इ.4थी) केंद्रात दुसरा, श्लोक सातव (इ. 4थी) केंद्रात दुसरा

अशा या अवघड समजल्या जाणाऱ्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी शाळेतील नम्रता साळुंके, पूजा चावरे, रजनी परदेशी,अर्चना जाधव या शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष जयप्रकाश बिले, सचिव युवराज बिले, संचालिका डॉ. स्वाती बिले, मुख्याध्यापिका अमृता परदेशी यांनी केले.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *