वांगी नं 4 येथील विकासरत्न शेतकरी बचत गटामार्फत विविध गुणसंपन्न केलेल्या विद्यार्थ्यांचा ट्रॉफी देऊन गौरव
करमाळा प्रतिनिधी
जि .प .प्रा. शाळा वांगी नं:4 येथे विकासरत्न शेतकरी बचत वांगी नं 4 गटामार्फत विविध गुणसंपन्न केलेल्या विद्यार्थ्यांचा ट्रॉफी देऊन गौरव- आज 74 प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून सामाजिक बांधिलकी जपण्याच्या उद्देशाने जिल्हा परिषद शाळेमध्ये घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांच्या स्पर्धा मधील मुलांना विकासरत्न बचत गटाचे अध्यक्ष विठ्ठल शेळके, सचिव सुग्रीव नलवडे ,सदस्य गणेश वाघमारे ,तानाजी हरणावळ गणपत जाधव, नानासाहेब नलवडे, अमोल शेळके, शशिकांत नलवडे ,शिवाजी हरणावळ शिवाजी सुळ आदी मान्यवरांच्या उपस्थितीत वितरण करण्यात आले तसेच ध्वजारोहण शाळा

व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष भानुदास यादव यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी वांगी नंः4 ग्रामपंचायत सरपंच सौ. सविता सुळ, वांगी ग्रामपंचायत माजी सरपंच सौ. स्वाती शेळके, राज्य विक्री कर निरिक्षक कु. सोनाली शेटे, ग्रामपंचायत सदस्य धनसिंग शेटे, आबासाहेब राखुंडे तसेच मुख्याध्यापक भारत भानवसे उपशिक्षक राजाराम भिसे ,दत्तूदादा सरडे ,कुंडलिक सातव यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांनी अभ्यासातील विविध कौशल्य सादर केले . यावेळी राज्या विक्रीकर निरीक्षकपदी निवड झालेल्या कु. सोनाली शेटे हिचा विशेष सत्कार करण्यात आला .तसेच यावेळी शाळेत लावलेल्या सेंद्रिय उसाचा 200 लिटर रस ग्रामस्थांना विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आला .कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गजेंद्र सातव, सुभाष वाघमारे, प्रमोद शेळके, अमोल वाघमारे आदींनी विशेष परिश्रम घेतले.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *