करमाळा प्रतिनिधी

यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात महिला दिन साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून, स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. कविता कांबळे या होत्या. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अभिमन्यू माने हे होते. यावेळी महाविद्यालयामध्ये महिला दिनानिमित्त रांगोळी व संगीत खुर्ची स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. रांगोळी स्पर्धेत प्रथम क्रमांक संजना मारडकर, द्वितीय क्रमांक प्रतीक्षा वाघमारे, तृतीय क्रमांक विशाखा जाधव तसेच संगीत खुर्ची स्पर्धेत प्रथम क्रमांक प्रतीक्षा वाघमारे, द्वितीय क्रमांक ऋतुजा शेळके, तृतीय क्रमांक मानसी वासानी हिने मिळविला. या विजेत्यांचा सत्कार डॉ. कविता कांबळे यांच्या हस्ते करण्यात आला. या प्रसंगी डॉ. कविता कांबळे यांनी मुलींचे आरोग्य व नैतिक मूल्ये या विषयावर मौलिक असे मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. रुपाली थोरात, प्रा.पल्लवी अनारसे यांनी केले. उपस्थितांचे आभार प्रा. सरला चव्हाण यांनी मानले. या कार्यक्रमास महाविद्यालयातील विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *