
आमदार शिंदे यांनी रोशेवाडी ग्रामस्थांची घेतली भेट
करमाळा प्रतिनिधी
आमदार संजयमामा शिंदे यांनी आज रोशेवाडी येथे गाव भेट दौरा निमित्त ग्रामस्थांशी अडचणी जाणुन घेतल्या चर्चा विनिमय केली होती. यावेळी सरपंच नंदा विक्रम धायतोंडे यांनी कमलागिरी मंदिरासाठी निधी, वॉटर सप्लाय कडे जाणारा रोड, स्मशानभूमी, ग्रामपंचायत कार्यालय व कुकडी कॅनलला पाणी सोडण्याबाबत मागणी केली होती यावेळी आमदार शिंदे

यांनी गावातील सर्व समस्या नोंद करून घेतली व लवकरच मारगी लावल्या जाईल असे सांगितले आहे. यावेळी उपसरपंच किशोर गौतम कांबळे, सदस्य ज्ञानदेव पवार ,सारिका शिवाजी चव्हाण, लंकाबाई अण्णा थोरात, ललिता नाना रेगुडे, यशपाल गौतम कांबळे, ग्रामसेविका स्वाती जाधव,व जि.प.मा सदस्य उध्दव माळी,सुजित बागल, ग्रामस्थ विक्रम धायतोंडे, रामभाऊ

देवकर, किरण मोरे, आदिनाथ मोरे, सचिन शिंदे ,विशाल साळुंके, रघुनाथ कांबळे, कांतीलाल साळुंके, नामदेव गोरे, सुभाष मोरे, मगनदास शिंदे, श्रीकांत मोरे, श्रीराम रेगुडे, सतीश कांबळे, लक्ष्मण थोरात, कांतीलाल साळुंके, हनुमंत राखुंडे आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी आ संजयमामा शिंदे यांचा सत्कार ग्रामस्थांच्या वतीने विक्रम धायतोंडे व श्रीकांत मोरे यांच्या हस्ते करण्यात आला होता
