करमाळा प्रतिनिधी
करमाळा नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक निकाल 21 डिसेंबर रोजी लागला असून पंधरा दिवस उलटूनही नगराध्यक्ष व नगरसेवकांनी आपला पदभार देण्यात आला नव्हता परंतु बुधवार 7 जानेवारी रोजी नगराध्यक्ष मोहिनीताई सावंत यांनी मुख्याधिकारी सचिन तपसे यांच्याकडून नगरपरिषदेचा पदभार घेतला आहे. करमाळा शहर विकास आघाडी यांचा नगराध्यक्ष व 8 नगरसेवक, भाजपचे 7 नगरसेवक तर शिवसेनेचे 5 नगरसेवक असल्याने त्रिशंकू स्थिती निर्माण झाली आहे.


नगराध्यक्ष मोहिनीताई सावंत यांनी पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी बोलताना सांगितले की, करमाळा शहराच्या विकासासाठी मी कटिबद्ध असून शहरवासीयांनी दिलेल्या अभुतपूर्व यशामुळेच मी नगराध्यक्ष पदावर विराजमान झाले आहे. मी शहरातील नागरिकांच्या प्रत्येक समस्या सोडवणार असून भविष्यात चांगले कामकाज करून करमाळा नगरपालिकेचे नाव संपूर्ण राज्यात पोहचविण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करेल असे बोलताना नगराध्यक्ष मोहिनीताई सावंत म्हणाल्या.
यावेळी नगरसेवक संजय सावंत सावंत, गटाचे युवा नेते पै. सुनील बापू सावंत, पंचायत समितीचे माजी सदस्य तसेच हमाल पंचायतीचे अध्यक्ष अॅड. राहुल सावंत, गणेश सावंत व सावंत गटाचे असंख्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *