करमाळा प्रतिनिधी

पांडे जिल्हा परिषद गटामधून आमदार नारायण आबा पाटील यांनी उमेदवारी दिली तर सर्व शक्तीनिशी लढणार महाराष्ट्र चॅम्पियन महिला कुस्तीगीर पैलवान पल्लवी दत्तात्रय सुपनवर यांनी मत व्यक्त केले. पांडे जिल्हा परिषद गट महिला राखीव असल्यामुळे मला काम करण्याची संधी द्यावी. आमचे आजोबा कै. पांडुरंग सुपनवर हे करमाळा पंचायत समितीचे सदस्य म्हणून बिनविरोध निवडून आले होते, करमाळा कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये संचालक होते, यशवंतराव चव्हाण महाविद्यालय, महात्मा गांधी विद्यालय करमाळा या संस्थेमध्ये ते सदस्य होते, आदिनाथ शिक्षण प्रसारक मंडळ संगोबा या संस्थेचे ते संस्थापक अध्यक्ष होते, पांडे ग्रामपंचायतचे सलग पंधरा वर्षे सरपंच होते, सलग ३५ वर्ष पांडे ग्रामपंचायत वर सत्ता होती, आमच्या आजी कै. आयोध्या सूपनवर याही पांडे ग्रामपंचायत सदस्य होत्या, माझे चुलते अण्णासाहेब सुपनवर यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी, माजी मंत्री आमदार सदाभाऊ खोत, शेतकरी नेते रविभाऊ तुपकर यांच्या शेतकरी चळवळीमध्ये ऊस दर आंदोलन, दूध दरवाढ, कुकडी लाभ क्षेत्रामध्ये मांगी तलावाचा समावेश करण्याबाबत, मांगी तलावातून सतरा गावांना कॅनल द्वारे पाणी सोडण्यात यावे म्हणून अशी अनेक आंदोलन त्यांनी केली, करमाळा ते माळवाडी निलज रस्त्यासाठी प्रयत्न केले. बोरगाव ते दिलमेश्वर रस्त्यासाठी, बोरगाव ते वडाचीवाडी संगोबा ते निलज, गायकवाड वस्ती पांडे ते खांबेवाडी, खांबेवाडी ते करंजे, आळजापूर ते जातेगाव, खडकी ते आळजापूर, रावगाव ते धाकटवाडी या रस्त्यासाठी प्रयत्न करणार, श्री आदिनाथ मंदिर संगोबा, श्री शनेश्वर मंदिर पोथरे, श्री जगदंबा मंदिर पांडे, श्री संत निवृत्तीनाथ पालखी विसावा रावगाव या देवस्थानचा तीर्थक्षेत्रामध्ये समाविष्ट करण्याबाबत प्रयत्न करणार, आमदार नारायण आबा पाटील यांनी निष्ठावंत व नवीन चेहऱ्यांना संधी देणार असे जाहीर केल्यामुळे त्यांनी माझ्या उमेदवारीचा विचार करावा आणि मला पांडे जिल्हा परिषद गटामधून उमेदवारी द्यावी अशी मागणी करीत आहे

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *