करमाळा प्रतिनिधी

आमदार नारायण आबा पाटील यांच्या वाटेस रखडलेली विकासकामे येतात, पण तुमचे आशीर्वाद व पाठबळ याच्या जीवावर हि आव्हाने त्यांना समर्थपणे पेलता आली असे प्रतिपादन करमाळा तालूक्याचे युवानेते पृथ्वीराज पाटील यांनी केले. खांबेवाडी ता. करमाळा येथील कार्यक्रमात ते बोलत होते. विद्यमान आमदार नारायण आबा पाटील यांच्या स्थानिक विकास निधीतून अर्थात आमदार फंडातून तसेच विविध शासकीय लेखाशिर्ष अंतर्गत खांबेवाडी गावासाठी ४० लाख रुपयांचा निधी मंजूर

करण्यात आला. या निधीतुन मंजूर कामांचे भूमिपूजन पृथ्वीराज पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक देवाभाऊ बागल, पाटील गटाचे प्रवक्ते सुनिल तळेकर, शेतकरी संघटनेचे नेते अण्णासाहेब सुपनवर, ग्रामपंचायत सदस्य भीवा वाघमोडे, दिलमेश्वरचे माजी सरपंच विलास मारकड, उपसरपंच भैय्या शिंदे, शिवा नरुटे, ग्रामपंचायत सदस्य दादा वायकुळे, संजय पाटील (बोरगाव), ग्रामपंचायत सदस्य सोमनाथ नाळे (निलज), ग्रामविकास अधिकारी नायकुडे भाऊसाहेब, शहाजी हाके, तुकाराम कोळेकर, विजय टकले, मच्छिंद्र कांबळे, शहाजी शिंदे, अजिनाथ शिंदे, संभाजी शिंदे, बापु शिंदे, आप्पा टकले, सुनील नरुटे, बाळू वायकुळे, बापु देवकाते आदि उपस्थित होते. यावेळी बोलताना पृथ्वीराज पाटील यांनी मांगी तलावात कायमस्वरुपी पाणी आणले जाउन या परिसरात शेतीसाठी सर्व‌ हंगामात पाणी उपलब्ध करुन देण्यासाठी योग्य ते नियोजन केले जाईल असे सांगितले. तर देवाभाऊ बागल यांनी आपल्या भाषणातून आगामी निवडणुकीत सुध्दा खांबेवाडीसह सीनाकाठच्या गावांनी आमदार नारायण आबा पाटील यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहुन या भागास आणखी विकासनिधी उपलब्ध करुन घ्यावा. एकमताने पाटील गट जो उमेदवार दिला जाईल त्याच्या पाठीशी उभे रहावे असे आवाहन केले. अण्णासाहेब सुपनवर यांनी सुत्रसंचलन व‌ प्रास्ताविक केले तर उपसरपंच भैय्या शिंदे यांनी आभार मानले.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *