करमाळा प्रतिनिधी
सामाजिक कार्यकर्त्या पद्मजा इंगवले जगताप यांनी त्यांचा वाढदिवस ज्ञान प्रबोधन मतिमंद निवास कार्यशाळा कोर्टी या ठिकाणी मतिमंद मुलांबरोबर साजरा केला तसेच तेथील मुलांना ब्लॅंकेट खाऊ व 50 किलो गहू आणि तांदळाचे धान्य दान केले.
यावेळी ज्ञान प्रबोधन यांचे संचालक मोहित बागडे, इंदुमती मेहेर, ललिता मेहेर, योगिता मासाळ, पुष्पा वायदंडे, सुनिता मेहेर, मंगल मेहेर, दादा रंधवे, संजय वायदंडे, भीमा मेहेर उपस्थित होते.