मकाईवर शंभर टक्के पेमेंट मिळाल्या शिवार कामावर येणार नाही कर्मचाऱ्यांनी केला ठराव
करमाळा प्रतिनिधी
मकाई सहकारी साखर कारखान्याच्या
200 प्लस कामगारांनी एकमताने घेतला ठराव मागील देणे 100% मिळाल्याशिवाय कुणीही कामावर येणार नाही.
मागील 19 तारखेच्या मीटिंग नंतर आज 11 दिवस झाले प्रशासनाकडू कसल्याही स्वरूपाचा प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे कामगारांनी आज दुसरी मीटिंग बोलवली व प्रशासनास दिली पाच तारखेपर्यंत मुदत त्यानंतर आंदोलन तीव्र करणार व याची जबाबदारी पूर्णपणे मॅनेजमेंटची असेल कामगारांचे स्पष्ट मत .आम्ही फक्त आमच्या कामाचा पगार मागतोय कामगार कारखान्याचे हितासाठीच सौम्य स्वरूपात आपली भूमिका मांडत आहे .परंतु प्रशासनच कारखान्याच्या हिताचा विचार करताना दिसत नाही. कामगारांची देणे देत असताना 2016 ते 2023 या कालावधीत ज्याही पगार वाढ शासनाकडून आल्या होत्या त्या सर्व फरकासहित मिळाव्यात त्याचबरोबर मयत कर्मचाऱ्यांची देणे व इतरही रिटायर झालेले कर्मचाऱ्यांची देणे सर्वांची देणे चुकते करावीत अशा स्वरूपाचे ठराव कामगारांनी एकमताने घेतले

कामगारांची संपूर्ण देणे मिळाल्याशिवाय एकही कामगार हातात पाना घेणार नाही.. रोहिदास गिरंजे कामगार प्रतिनिधी

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *