करमाळा प्रतिनिधी

टेंभुर्णी जातेगाव महामार्गावरील करमाळ्याची असणाऱ्या देवळाली ग्रामपंचायती कडून वारकऱ्यांसाठी विशेष सुविधा दिल्या जाणार असल्याची माहिती सरपंच पोपट बोराडे यांनी दिली. या रस्त्यावरून ज्या काही पालख्या मार्गस्थ होतील त्या सर्वच वारकऱ्यांसाठी पाणी व्यवस्था, मालीश व्यवस्था, दवाखान्याची व्यवस्था व केश कर्तन व्यवस्था आदी सुविधा मोफत दिल्या जाणार असून या कामाची पाहणी करमाळा तालुक्याचे माजी आमदार संजयमामा शिंदे यांनी केली.

यावेळी प्रकल्प संचालक (D.R.D.A) ठोंबरे, गट विकास अधिकारी करमाळा कदम, गटविकास अधिकारी उत्तर सोलापुर भोंग, उपायुक्त म.न.पा.सोलापूर लोकरे, सी आर पी येळवणे, ग्रामविकास अधिकारी नागरसे भाऊसाहेब व निकम भाऊसाहेब तसेच देवळाली गावचे सरपंच पोपट बोराडे, माजी सरपंच आशिष (आण्णा) गायकवाड, बापु गुंड,गणेश पाटील,विलास चव्हाण,सुनील आवटे,सुनील(दादा)कानगुडे,सुभाष कानगुडे,ऋषी गायकवाड व वारकरी उपस्थित होते.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *