करमाळा प्रतिनिधी

योगासने आणि प्राणायाम शिवाय कुठल्याही व्यक्तीचे जीवन व्यवस्थितपणे तो जगू शकणार नाही यासाठी आज आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्त दरवर्षीप्रमाणे 21 जून हा दिवस जागतिक योग दिन म्हणून साजरा केला जातो. आज या दिनाचे औचित्य साधून श्री रामचंद्र बहुउद्देशीय सामाजिक सेवाभावी संस्था संचालित स्नेहालय न्यू इंग्लिश स्कूल मध्ये

आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी योग शिक्षिका पाटील मॅडम यांनी विद्यार्थ्यांना विविध योगासने तसेच प्राणायाम शिकवले. या वेळी शाळेच्या मुख्याध्यापिका धनश्री दळवी यांनी तसेच सर्व शिक्षक बांधवांनी यामध्ये उत्साहाने सहभाग घेऊन विद्यार्थ्याकडून सर्व आसन योगासने प्राणायाम व व्यायाम प्रकार करून घेतले. सर्व विद्यार्थ्यांनी अतिशय आनंद घेत योगासने व कवायत केली. आजचा योग दिन अतिशय उत्साह पूर्ण वातावरणात पार पडला.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *