करमाळा प्रतिनिधी

पांडे जिल्हा परिषद गटामध्ये गरजु विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप करणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष संतोष वारे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले आहे. यावेळी युवक अध्यक्ष केशव चोपडे, समाधान शिंगटे,सचिन नलवडे आदीजण उपस्थित होते.

पुढे बोलताना वारे म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरदचंद्र पवार यांच्या आशीर्वादाने आम्ही पुर्वी खुप सामाजिक उपक्रम राबविले होते. यामध्ये कोरोना काळात गोरगरिबांना किराणा किट, अन्नदान, तसेच पाणी टंचाई प्रसंगी नागरीकांना पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी म्हणून पाणी टँकर चालू केले होते. जनावरांना चारा मिळत नाही,  शेतकऱ्यांना चाऱ्याची कमतरता भासत होती, त्यामुळे आम्ही चारा छावणी सुरू केली होती. असे अनेक सामाजिक उपक्रम राबविले जात आहे.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *