
करमाळा प्रतीनिधी
आरोग्य भवन येथे शिवसेना गटात प्रवेश केल्यानंतर माजी आमदार जयंतराव जगताप व माजी आमदार शहाजी बापू पाटील यांनी राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांची भेट घेतली. या बैठकीत करमाळा गावातील आरोग्य विषयक समस्या व गरजांवर सविस्तर चर्चा झाली.

या भेटीदरम्यान करमाळा विधानसभा क्षेत्रात विविध आरोग्यविषयक व अन्य विकासकामांना कशा पद्धतीने गती देता येईल, यावर सखोल विचारमंथन करण्यात आले. मंत्री आबिटकर यांनी या मागण्यांचा सकारात्मक विचार करून लवकरच आवश्यक त्या विकासकामांना मंजुरी मिळवून देण्याचे आश्वासन दिले. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आरोग्य विभागाचे प्रमुख मंगेश चिवटे उपस्थित होते.
ही भेट करमाळा तालुक्यातील आरोग्य सुविधांच्या विकासाच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरली आहे.
