
करमाळा प्रतिनिधी
मौजे सावडी येथील काळूबाई मंदिर सुशोभिकरण करण्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे मा. तालुकाध्यक्ष हनुमंत मांढरे-पाटील यांनी नुकतीच ग्रामविकासमंत्री तथा सोलापूर जिल्हा पालकमंत्री जयकुमार गोरे यांची मुंबई येथे भेट घेऊन केली आहे. त्यावेळेस गोरे यांनी देखील निधी उपलब्ध करून द्यायचा शब्द दिला आहे अशी माहिती मांढरे पाटील यांनी दिली.

