
करमाळा प्रतिनिधी
श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल मधील इयत्ता दहावी परीक्षेचा निकाल ९५.२३ टक्के लागला असुन तनुजा सुनिल खराडे ही ९१ टक्के गुण मिळवून प्रथम आली आहे. द्वितीय वैष्णवी सचिन झाकणे ८९.६०, तृतीय प्रज्ञा संदिप आदलिंगे ८५.८० तर यश अनिल शिंदे यास ८५ टक्के व ऐश्वर्या सुनिल हुलगे हिस ८४ टक्के गुण मिळाले आहेत. यशस्वी विद्यार्थ्यांना वर्गशिक्षक आबासाहेब कारंडे यांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे चेअरमन डॉ. महेश अभंग, सचिव एँड.अनुप अभंग, मुख्याध्यापिका ज्योती चव्हाण-शिंदे, शाव्यध्यक्ष बापु शिंदे यांनी अभिनंदन केले.

