करमाळा प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे फेब्रु/मार्च 2025 परीक्षा इयत्ता 12 वी वार्षिक निकाल जाहीर झाला. करमाळा येथील विद्या विकास मंडळ संचलित यशवंतरात चव्हाण महाविद्यालय इयत्ता 12 वीचा 95.32 % निकाल लागला आहे. यामध्ये विज्ञान शाखेचा 98.52 %, वाणिज्य शाखेचा 97.77 % तर कला शाखेचा 92. 01 % निकाल लागला आहे. विज्ञान शाखेमध्ये – प्रथम तीन क्रमांक कोंडलकर भक्ती सतीश 73.67 % प्रथम क्रमांक, व्हरे सिद्धी यशवंत 73.50% द्वितीय क्रमांक, कोळेकर विक्रमादित्य बाळासाहेब 73.17 % तृतीय क्रमांक, वाणिज्य शाखेमधील प्रथम तीन क्रमांक – वासानी मानसी हेतल 90.67 प्रथम क्रमांक, सांगळे अमृता नितीन 87.17 द्वितीय क्रमांक, चौगुले अनुष्का संतोष 85.50 तृतीय क्रमांक, कला शाखेचे प्रथम तीन क्रमांक – मारडकर संजना अनिल 88.00% प्रथम क्रमांक, गोरे पुजा राजेंद्र 86.50% द्वितीय क्रमांक, शेख गुलनाज अबूबकर 82.33% तृतीय क्रमांक असे विज्ञान, वाणिज्य व कला शाखेतील प्रथम तीन क्रमांक आलेले आहेत.

या सर्व यशस्वी व गुणवंत विद्यार्थ्यांचे संस्थेचे सचिव विलासराव घुमरे सर, संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य मिलिंद फंड, संस्थेचे सहसचिव विक्रमसिंह सुर्यवंशी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एल.बी.पाटील, कनिष्ठ विभागाचे उपप्राचार्य संभाजी किर्दाक व कनिष्ठ विभागाचे सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *