
करमाळा प्रतिनिधी
करमाळा नगरपालिका सफाई कर्मचाऱ्यांचा संबंधित ठेकेदारांनी गेली तीन महिन्यापासून पगार केला नव्हता भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती समोर आलेली असताना सुद्धा सफाई कामगारांना हा ठेकेदार उलट सुलट उत्तर देत होता ठेकेदाराला नगरपालिका प्रतिदिन 619 रुपये प्रमाणे सफाई कामगारांना पगार देत होती मात्र ठेकेदार केवळ 330 रुपयांनी सफाई कामगारांना गेली चार वर्षापासून पगार देत आहे. सर्व 53 सफाई कामगारांनी शिवसेना कार्यालयात येऊन आपली कैफियत जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांच्याकडे मांडली होती. यावर शिवसेनेने आवाज उठवून त्या ठेकेदाराच्या तोंडाला काळे फासू व त्याचे दहा लाख रुपये डिपॉझिट जप्त करून त्यातून पगार करा अशी मागणी केली होती. आंदोलनाची दखल घेत तात्काळ या ठेकेदाराने सफाई कामगारांचा दोन महिन्याचा पगार अदा केला आहे.

………………………..
संबंधित ठेकेदाराला सूचना दिल्या असून दोन महिन्याचा पगार कामगारांना दिला आहे. या पुढील काळात वेळेवर पगार करण्याचे सूचना ठेकेदाराला दिले आहेत. केंद्र सरकारच्या श्रम मंत्रालयानुसार किमान 530 रुपये प्रमाणे सफाई कामगारांना पगार द्यावे अन्यथा गुन्हे दाखल करू व त्याचे आमच्याकडे असलेल्या दहा लाख रुपये डिपॉझिट जप्त करून सफाई कामगारांना वाटू असे सूचना दिले आहेत – सचिन तपसे मुख्याधिकारी करमाळा नगरपालिका

………………………
केंद्र सरकारच्या नियमाप्रमाणे 530 रुपये प्रमाणे ठेकेदारांनी सफाई कामगारांना पगार दिला पाहिजे. कामगारांचा पीएफ ठेकेदाराने भरला पाहिजे. सफाई कामगारांना सर्व साहित्य गणवेश बूट हत्यारे पोच केले पाहिजे. शुक्रवारी पुन्हा नगरपालिकेसमोर सर्व कामगारांना घेऊन आंदोलन करणार असून जोपर्यंत त्या ठेकेदाराची डिपॉझिट जप्त करून सफाई कामगारांची मागील देणे देत नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार आहेत – महेश चिवटे शिवसेना जिल्हाप्रमुख