करमाळा प्रतिनिधी

झरे तालुका करमाळा जिल्हा सोलापूर येथील सरपंच निवड प्रक्रिया पार पडली. सदर ग्रामपंचायत विलासराव आनंदराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशांत पाटील यांनी जिंकुन दाखवली त्यानंतर 6 विरुद्ध 5 असे संख्याबळ असताना प्रशांत पाटील यांनी आपल्या मातोश्री सुनीता पाटील या सदस्य म्हणून निवडून आलेल्या असताना व सरपंच पद हे सर्वसाधारण या जागेसाठी आरक्षित असताना मी माझ्या घरात सरपंच पद घेणार नाही असे सांगून 5 वर्षात 5 सरपंच असा नवीन आदर्श

आपणा सर्वांसमोर ठेवला व आज तो शब्द पूर्ण केला सदर प्रक्रियेत सरपंच म्हणून मंजुश्री मयूर मुसळे यांचा एकमेव अर्ज मंडल अधिकारी यांच्याकडे आल्याने सरपंच निवडीचे कामकाज पूर्ण झाल्यानंतर मंडल अधिकारी सतीश भंडारे यांनी मंजुश्री मयूर मुसळे या मौजे झरे तालुका करमाळा येथील सरपंच पदावर बिनविरोध निवडून आल्याचे जाहीर केले. सदर सरपंच निवडी वेळी ग्रामपंचायत सदस्य सुनीता पाटील, सुनीता कांबळे, मैना घाडगे, मच्छिंद्र घाडगे, भारत मोरे, सोमनाथ घाडगे उपस्थित होते. त्याचबरोबर पाच वर्षात पाच सरपंच म्हणून सर्व सदस्यांना देखील सरपंच पदाचा मान देऊन पार्टी प्रमुख प्रशांत हनुमंतराव पाटील यांनी झरे पॅटर्न राबवून करमाळा तालुक्यात व सोलापूर जिल्ह्यात एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे. या त्यांच्या कार्याबद्दल  ग्रामस्थांनी त्यांचे व नूतन सरपंच यांचे अभिनंदन केले.

यावेळी भीमराव घाडगे, बबन घाडगे, हनुमंत पाटील, पोपट घाडगे, सुरेश पाटील, संजय कांबळे, बाबासाहेब सरोदे, दिलीप कांबळे, सुदाम सरोदे, मनोज गरड, रामदास गायकवाड, अनिल मिटे, विजय माने, बाबासाहेब घाडगे, बाळासाहेब घाडगे, किशोर पाटील, मयुर मुसळे, अशोक घाडगे, बंडू बोराटे, दिपक बोराटे, प्रदीप मिटे, बापू होनराव, संतोष मुरूमकर, संतोष शिंदे, अमोल मुसळे, प्रदीप घाडगे व गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.

यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मंडळाधिकारी भंडारे भाऊसाहेब व त्यांना मदतनिस म्हणून ग्रामसेवक भुजबळ भाऊसाहेब यांनी काम पाहिले.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *