करमाळा प्रतिनिधी

करमाळा येथील ज्येष्ठ पत्रकार कमलादेवी औद्योगिक वसाहतीचे सचिव नासीरभाई कबीर व करमाळा महसुल मंडल अधिकारी हुस्नोदिन कबीर यांच्या मातोश्री रशिदाबी शमसुद्दीन कबीर वय ९१ मोहल्ला गल्ली करमाळा यांचे राहत्या घरी वृध्दापकाळाने दुखःद निधन झाले आहे. त्यांच्या पश्चात तीन मुले, दोन मुली, सुना, नातवंडे, पणतू असा मोठा परिवार आहे.

सैराट फेम सल्या उर्फ अरबाज शेख यांच्या त्या आजी होत्या. रशिदाबी कबीर यांचे रमजानच्या पवित्र महिन्यात निधन झाल्याने त्याला विशेष महत्त्व असुन रमजान महिन्यात निधन झाल्यानंतर त्यांना स्वर्गात स्थान मिळते अशी धारणा असल्यामुळे हे मरण पवित्र मानले जाते.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *