करमाळा प्रतिनिधी

सध्या करमाळा तालुक्यातील पश्चिम भागात उजनी काठी वांगी, सोगाव, केतुर, चिखलठाण, खादगाव या भागामध्ये सर्रासपणे वाळू उपसा चालू असून महसूल प्रशासन मात्र डोळे झाकपणा करताना दिसून येत आहे उजनी काठी चालू असलेल्या सर्व बोटी वरती कारवाई करावी या बाबतीत आपण जिल्हाधिकारी व महसूल मंत्री यांची भेट घेणार असून तालुक्यातील अवैध वाळू उपसा काही दिवसांपूर्वी महसूल प्रशासनाने केलेली कारवाई म्हणजे दिखावा पणा आसल्याचे  वाळू साठा सापडतो बोट सापडते मग अवैध वाळू काढणारे संशयित का सापडत नाहीत आसा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडला आहे. लोकप्रतिनिधीला जर अवैध वाळू उपसा बंद करण्यासाठी जिल्हाधिकारी यांना पत्र देण्याची वेळ येत असेल तर स्थानिक प्रशासन कोणाच्या नियंत्रणाखाली काम करते हा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडला आहे. शासनाचा लाखो रुपयाचा महसूल बुडवून

बेकायदेशीरपणे वाळू उपसा करणार्या ला अभय देऊन आपलं आर्थिक उकळ पांढर करणार्यां वरती कारवाई झाली पाहिजे अवैध वाळू उपसा बंद करून कोणाच्या आशीर्वादाने हा गोरस धंदा चालू आहे याची चौकशी करून कारवाई करावी अन्यथा आपण कार्यकर्त्यांसह दिनांक 26 जानेवारी पासून जिल्हाधिकार्यालय सोलापूर बेमुदत उपोषणास बसणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे माजी तालुकाध्यक्ष हनुमंत मांढरे पाटील यांनी दिली आहे.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *