करमाळा प्रतिनिधी

पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालय रावगाव येथे “भारतीय संविधान दिन” मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी प्रभात फेरी काढून संविधानाविषयी जागृती केली. या निमित्ताने शाळेमध्ये वकृत्व स्पर्धा, संविधान दिन पोस्टर स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाच्या सुरवातीला २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात वीरगती प्राप्त झालेल्या शहिदांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रशालेचे ज्येष्ठ शिक्षक भाऊसाहेब सरडे होते. यावेळी संविधानाचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचे व संविधानाच्या प्रतीचे पूजन करण्यात आले. यावेळी सर्व विद्यार्थी आणि शिक्षकांनी शपथ घेऊन भारतीय राज्यघटनेशी असलेल्या त्यांच्या बांधिलकीला दुजोरा दिला. विद्यार्थ्यांना संविधानाचे पालन करण्याचे आणि महान देशाचे नागरिक असल्याचा अभिमान बाळगण्याचे आवाहन करण्यात आले.

प्रशालेचे ज्येष्ठ शिक्षक किरण परदेशी सर यांनी भारतीय संविधानाविषयी माहिती सांगताना प्रत्येक भारतीय नागरिकाने संविधानाप्रती आदर आणि निष्ठा ठेऊन वागले पाहिजे. घटनेतील तत्वाप्रमाणे वागलो तर निश्चितच देशाचा व्यवहार चोख होईल. राज्यघटना ही एक जिवंत दस्ताऐवज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

याप्रसंगी शाळेचे भाऊसाहेब सरडे सर, किरण परदेशी सर, हनुमंत रासकर सर, प्रताप बरडे सर, अंजली लांडगे मॅडम, सुहास कानगुडे सर आदी शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थीनी कु. प्रतीक्षा बरडे हीने करून कु. श्रावणी वारे या विद्यार्थिनीने आभार मानले.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *