
करमाळा प्रतिनिधी
मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची करमाळा तालुक्याचे माजी आमदार संजयमामा शिंदे यांनी भेट घेऊन दादांचे, विधानसभा निवडणुकीत पक्षाला मिळालेल्या घवघवीत

यशाचे तसेच बारामती मतदारसंघातून प्रचंड मताधिक्याने निवडून आल्याबद्दल अभिनंदन केले.
याप्रसंगी निमगाव (टें) चे सरपंच यशवंत भैय्या शिंदे, माजी जि.प.सदस्य संजय पाटील-भिमानगरकर आदी उपस्थित होते.
