करमाळा प्रतिनिधी
सांगोला कविराज मंगल कार्यालय येथे रिपब्लिकन पार्टी आँफ इंडिया आठवले सोलापूर जिल्हा कार्यकारिणीची महत्त्व पुर्ण बैठक संपन्न झाली. याप्रसंगी केंद्रीय राज्यमंत्री तथ रिपाइं राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. रामदास आठवले यांच्या आदेशानुसार भाजपा, आरपीआय आठवले, राष्ट्रवादी, शिवसेना मित्र पक्षाचे महायुतीचे सोलापूर जिल्ह्यातील सर्व उमेदवार भरगोस मतांनी विजयी करावेत असे प्रतिपादन आरपीआय आठवले प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सरवदे यांनी सांगोला येथील रिपब्लिकन पक्षाच्या जिल्हा बैठकी प्रसंगी बोलताना केले.
यावेळी महाराष्ट्र राज्य सचिव सुनील सर्वगोड, महाराष्ट्र राज्य संघटक बापू जगताप, प.महा.सरचिटणीस जितेंद्र बनसोडे व सोलापूर जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी बैठकीच्या अध्यक्षस्थानी सोलापूर जिल्हा अध्यक्ष सोमनाथ भोसले होते. बैठकीचे उपस्थितांचे स्वागत व प्रास्ताविक जिल्हा सरचिटणीस श्यामसुंदर उर्फ रवी गायकवाड यांनी केले.
सांगोला तालुकाध्यक्ष खंडू सातपुते, आक्कलकोट तालुकाध्यक्ष अविनाश मडिखांबे, माळशिरस तालुकाध्यक्ष मिलिंद सरतापे, पंढरपूर तालुकाध्यक्ष संतोष पवार, माढा तालुकाध्यक्ष मारुती वाघमारे, उत्तर सोलापूर तालुकाध्यक्ष विठ्ठल वाघमारे, दक्षिण सोलापूर तालुकाध्यक्ष रामजी गायकवाड, मंगळवेढा तालुकाध्यक्ष अशोक शिवशरण, सरचिटणीस, कार्याध्यक्ष, युवक तालुकाध्यक्ष उपस्थित होते.