करमाळा प्रतिनिधी

करमाळा येथील मुथा अबॅकस व वैदिक मॅथस अकॅडमी च्या संचालिका प्रा. ज्योती मुथा यांना दिव्य मराठी नारी शक्ती पुरस्कार मिळाला.

दैनिक दिव्य मराठी व विनय ग्रुप यांच्यावतीने हा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता.

मुथा अबॅकस व वैदिक मॅथस अकॅडमी चे कार्य पंधरा वर्षापासून चालू आहे करमाळ्यामधील विद्यार्थ्यांना घडवण्याचे काम करत आहेत. त्यांनी  राणा नोबल इंग्लिश मीडियम स्कूल येथे मुख्याध्यापिका म्हणून पाच ते सहा वर्ष काम केले. त्यांचे शिक्षण अहमदनगर जिल्ह्यामधील पारनेर तालुक्यात जामगाव या गावी झाले व महाविद्यालयीन शिक्षण छत्रपती संभाजी

नगर येथे झाले. याच काळामध्ये त्यांनी अबॅकस व वैदिक मॅथस याचे प्रशिक्षण घेतले. 2012 साली कुर्डूवाडी येथे महिला कॉलेज ला बी. एड. सक्सेसफुल कम्प्लीट केले. करमाळ्यात अबॅकस व वैदिक मॅथस याचे छोटेसे रोपटे लावले. प्रथम इंटरनॅशनल परीक्षा दिल्ली येथे करमाळ्यामधून पंधरा विद्यार्थ्यांना संधी उपलब्ध करून दिली व त्यामधून अकरा

विद्यार्थ्यांची आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांची निवड झाली. अशा अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील परीक्षा या अकॅडमी मधील विद्यार्थ्यांनी दिल्या व लवकरात लवकर छोट्या रोपट्याचे वटवृक्षात रूपांतर होताना दिसत आहे. तसेच बचत गट, जैन ग्रुप मार्फत सामाजिक काम करतात. या सर्व कार्याची दखल यश कल्याणी सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष गणेश करे पाटील

यांनी घेऊन आदर्श शिक्षिका म्हणून त्यांचा सन्मान मानपत्र देऊन करण्यात आला. मुथा अबॅकस अकॅडमी चे करमाळा येथील सर्व मीडिया काळजीपूर्वक दखल घेत आहे त्याबद्दल अकॅडमी सर्वांचे आभारी आहे. हे सर्व करत असताना अजमेर येथे मेमरी सयान्स याचे ऑफलाइन ट्रेनिंग ज्योती मॅडम यांनी घेतले व करमाळ्यातील अनेक विद्यार्थी घडवण्याचे काम ते करत आहे. ग्रामीण भागामध्ये शैक्षणिक नाविन्यपूर्ण उपक्रम आणण्याचे काम मुथा अबॅकस अकॅडमी करत आहे.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *